एकल महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आधार वेल महिला बहुउद्देशीय संस्था, गडचांदूर आणि नित्यानंद गोपालन केंद्र, गोपालपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नित्यानंद गोपालन केंद्राच्या परिसरात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर शैला ठाणेकर यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष निलेश ताजने होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष संजय मेंढी, धनंजय छाजेड, हंसराज चौधरी, डॉ. प्रदीप ठाकरे, प्रीती डोहे आणि वैशाली हेपट उपस्थित होते.
या वेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गरीब एकल महिला व पुरुषांना आधार वेल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वस्त्रदान करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी एकल महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणावर भर दिला. तर प्रीती डोहे यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नित्यानंद गोपालन केंद्राचे अध्यक्ष शंकर देवाळकर यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता विरुटकर यांनी तर आभार अनिता पानपट्टे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आधार वेल महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका उषा टोंगे, अध्यक्ष वंदना कातकडे, उपाध्यक्ष नलिनी खेकडे, सचिव कल्पना गोवारदिपे तसेच सदस्य कल्पना निमजे, वंदना धांडे, सविता चटप, अनिता बामनकर, नंदा कोंगरे, नंदा वांढरे, अनिता पानपट्टे, अर्चना काळे, अर्चना देवलवार, प्रभा वासाडे यांनी परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.



