ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्हाईस ऑफ मीडिया देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर 

अध्यक्षपदी विलास जगताप तर सचिवपदी सन्मति जैन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृह येथे व्हाइस ऑफ मीडिया चे तालुका अध्यक्ष अर्जुन आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच पार पडली, त्यात व्हाइस ऑफ मीडिया च्या तालुका अध्यक्षपदी पुण्यनगरी चे प्रतिनिधि विलास जगताप, उपाध्यक्षपदी विजय जाधव व शेख हनीफ, सचिवपदी पुण्यनगरी चे प्रतिनिधि सन्मती जैन, कोषाध्यक्षपदी पूजा कायंदे, सहसचिव पदी गजानन भालेकर, प्रसिद्धीप्रमुख पदी नंदकिशोर देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली, याप्रसंगी तालुक्यातील सर्व व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

 यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील मतकर, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप हिवाळे, रमेश चव्हाण, अमोल बोबडे,गजानन घुगे,देवानंद झोटे, खंडू माटे, गजानन भालेकर, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये