वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संघटनात्मक बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष तथा कोरपना व जिवती तालुका निरीक्षक दिव्यकुमार बोरकर होते.. प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदास मून, घनश्याम पिंपरे व तुकाराम दुर्योधन हे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात दिव्यकुमार बोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, फुले–शाहू–आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगली कामगिरी केली असून, संपूर्ण महाराष्ट्रात संघटना अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने उतरून यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रस्ताविक व मार्गदर्शन अमोल निरंजने यांनी केले. सभेचे संचालन आकाश पाझरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनराज निरंजने यांनी केले.
या सभेला दुर्गाजी आकेवार, बबन पेंदोर, तन्वीर कोतपल्लीवार, राणी वेलेकर, इंदुबाई तोटे, रोहन धोटे, केंद्रा निरंजन, तिस्तर निरंजन, रणवीर मून, सुनीता करमरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



