ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडपेठ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव तसेच वंदनीय तुकारामदादा गिताचार्य यांचा जयंती महोत्सव दि. १७ ते १८ जानेवारी दरम्यान सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महोत्सवानिमित्त ग्रामसफाई, ध्यानचिंतन, सामुदायिक प्रार्थना, योगासने, महिला मेळावा तसेच रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले. चंद्रपूर येथील मारोती साव यांचा व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. यासोबतच अकोला येथील राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे तसेच जुवाडी (सेलू), जि. वर्धा येथील बेबी वाघमारे यांचे गोपालकाला कीर्तन कार्यक्रम झाले. संपूर्ण गावातून रामधून पालखी काढण्यात आली. या पालखीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास योगगुरू विकास रामटेके, सुबोधदादा अड्याळ (टेकडी), निर्मला खडतकर (मोझरी), शुभांगी कुत्तरमारे (भद्रावती), बंडू दरेकर (भद्रावती), नामदेव आस्वले, संजय घुगुल, विजय आत्राम व गुणवंत कुत्तरमारे यांचे मार्गदर्शन लाभले. महोत्सवाच्या निमित्ताने माजी मंत्री हंसराज अहिर, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेनेचे मुकेश जिवतोडे तसेच भाजपाचे आकाश वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन घोडपेठ येथील सरपंच अनिल खडके यांनी केले, तर विवेक राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण महोत्सवासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, महिला व युवा सदस्य तसेच घोडपेठ ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये