
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भोजवार्ड, भद्रावती येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठेंगे यांच्या मातोश्री श्रीमती अनुसयाबाई मारोतराव ठेंगे यांचे गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्थानिक मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने ठेंगे कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



