ताज्या घडामोडी

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातअनेकांचा शिवबंध बांधीत पक्षप्रवेश

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट : अतुल कोल्हे भद्रावती :

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचा जनतेला विट आलेला आहे. सत्तेसाठी निष्ठा गहाण ठेवून राजकीय मंडळी वागत आहेत. जनतेच्या प्रश्नावर कुणाचेच लक्ष नाही. सत्तेत राहून मलिंदा लाटायचा व वाम मार्गाने कमावलेली संपत्ती सुरक्षित करायची, असा गोरखधंदा राजकारणी करीत आहेत. राज्यातील वातावरण गढूळ होत असताना मात्र शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली निष्ठा व प्रामाणिकता कायम ठेवली आहे. पक्षांतर्गत व इतर पक्षाचे नेते भ्रष्ट राजकारणाचा भाग होत असताना उध्दव ठाकरे यांनी मात्र हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासून पक्षाचा सन्मान, आपला आब, व सोज्वळ राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत त्यांची कार्यशैली सुरू आहे. याच नितीला चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे काम शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक कार्याला प्राथमिकता देवून करीत आहे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या मार्गदर्शनात भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, तालुका संघटीका आश्लेषा जिवतोडे-भोयर, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात (दि.१९) ला महेश पेटकर, प्रतिश मेश्राम, हितेश मेश्राम, प्रदिप वाडके, प्रफुल रायपुरे,  महिलामध्ये रेखा पेटकर, प्रेमिला सिवनितवार, पोटकन्नी वेंकटरमण यांनी शिवबंध बांधीत पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख माया नारळे, उप-तालुका संघटीका शिला आगलावे, उप-शहर प्रमुख शिला चामाटे, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे व शिवसैनिक पुरुष-महीला उपस्थित होते.

शिवसेनेत येणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्ती प्रमाणे कार्यरत असावे असे रविंद्र शिंदे म्हणाले.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये