ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

   गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती गुरुकुल महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सदस्य तथा कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. संजयराव मुसळे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन, पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर,ग्रंथपाल प्रा. सचिन कणॅवार डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, बोढाले सर, कुळसंगे सर, कुचनकर सर, खिरटकर सर, वाघाडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, अनिल कोसरे, ननिता बुरान, शालिक कांबळे, प्रशांत नवले, सविन मडावी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये