ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन अकादमीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना कौशल्य आधारीत रोजगार

ब्रह्मपुरी व सिंदेवाही तालुक्यातील 21 तरुणांची अभ्यासक्रमात नोंदणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर वनप्रशासन, विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे स्थित आहे. ही वन प्रशिक्षणासाठी एक प्रतिष्ठित संस्था आहे. महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून अकादमी वनीकरण, वन्यजीव, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदल या क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी प्रदान करण्याचा मुख्य उद्देश आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागधारकांशी सहकार्य करून अकादमी या क्षेत्रातील अग्रणी संस्था बनण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा प्राथमिक उद्देश वन प्रशासन आणि व्यवस्थापनातील व्यावसायिकांना संवर्धन आणि प्रशिक्षण देणे, बेरोजगार तरुणांच्या कौशल्यांना, कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे वाढविणे आणि त्यांना संबंधित नोकऱ्यांमध्ये स्थान देणे हे आहे.

हॉस्पिटॅलिटी आणि हाउसकीपिंगमध्ये कौशल्य विकास सुलभ करण्यासाठी चंद्रपूर, वन अकादमीने प्रसिद्ध एनजीओ, प्राथमशी भागीदारी केली आहे. अकादमी आणि प्राथम, भारतातील सर्वात मोठ्या गैरसरकारी संस्थांमध्ये करार झाला आहे. निवासी अभ्यासक्रम 60 दिवसांचा असतो आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तरुणांना हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतील.

सद्यस्थितीत ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही तालुक्यातील एकूण 21 तरुण या अभ्यासक्रमामध्ये नोंदणीकृत आहे. कार्यक्रमासाठी निधी, ब्रह्मपुरी प्रादेशिक विभागातील उपवनसंरक्षक यांच्याकडून देण्यात आला आहे. अकादमीच्या परिसरात शाश्वत इमारतीमध्ये सदरअभ्यासक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक श्रीनिवास रेड्डी, अतिरिक्त संचालक पियुशा जगताप उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये