ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा _ पत्रकारांचा केला सन्मान

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना केले अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ च्या वतीने पत्रकार भवन येथे दिनांक 6 जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके होते,सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . पत्रकार दिना निमित्त तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले .

        .मान्यवर पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांना शब्दसुमनांनी अभिवादन केले .

जेष्ठ पत्रकार सुरज गुप्ता व प्रा अशोक डोईफोडे यांनी पत्रकारितेत 36 वर्षं पुर्ण केल्याबद्दल पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

यावेळी ॲड आदिल पठाण, प्रभाकर मान्टे , गजानन तिडके यांनी पत्रकार दिन चे महत्त्व विषद केले.

           या सन्मान सोहळ्यामध्ये कार्याध्यक्ष गणेश डोके , उपाध्यक्ष मंगेश तिडके , सचिव सुरज गुप्ता , कोषाध्यक्ष प्रा अशोक डोईफोडे ‘ ज्येष्ठ पत्रकार अशोक जोशी ‘ शिवाजी वाघ , संतोष जाधव , , मुबारक शहा , मुन्ना ठाकूर ,राजेश खांडेभराड तथा महिला पत्रकार किरण वाघ , उषा डोंगरे ,संतोष वासुंबे ,शेख कदिर , परमेश्वर खांडेभराड ,अमोल हरणे ‘ दत्ता हांडे , इरफान भाई , बस्ती सर राजूभाऊ डोंगरे, राजेश पंडित, प्रविण काकडे,गायिका प्रित पाटील आदींची उपस्थिती होती.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव सुरज गुप्ता यांनी केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये