ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेदवारांच्या शपथपत्रांची माहिती होणार सार्वजनिक  

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 2 मे 2002 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदारांना उपलब्ध होणे हा मतदारांचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निवडणूकीतील उमेदवारांच्या शपथपत्राची माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.

  मा. सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील क्रमांक 7178/2001, दि. 2 मे 2002 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रता, मालमत्ता व देणी तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतचे शपथपत्र घेणे बंधनकारक आहे. सदर शपथपत्राचा नमुना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वेळोवेळी सुधारित करण्यात आलेला असून, त्यानुसार प्राप्त होणाऱ्या परिशिष्ट – 1 मधील शपथपत्रातील माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

   न्यायालयाने नमूद केले आहे की, मतदारांना उमेदवारांविषयी संपूर्ण व सत्य माहिती उपलब्ध झाल्यास ते सूज्ञ, स्वतंत्र व जबाबदार निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांकडून शपथपत्राद्वारे ही माहिती घेणे व ती सार्वजनिक करणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे उमेदवारांच्या शपथपत्रातील माहिती पुढील ठिकाणी प्रसिद्ध/उपलब्ध करून देण्यात येणार आहे –

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर, महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर,

स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरातद्वारे, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सूचना फलकावर उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध करून.

यामाध्यमातून मतदारांना उमेदवारांची सविस्तर माहिती उपलब्ध होऊन सूज्ञ व जबाबदार मतदान करण्यास मदत होणार आहे, असे निवडणूक प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये