ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक _ ५६५ नामनिर्देशन पत्र दाखल

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (मंगळवार ३० डिसेंबर २०२५) रोजी ५५२ नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहेत.

   मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन एकुण ५६५ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी ३१ डिसेंबर, २०२५ (बुधवार) सकाळी ११ वाजल्यापासुन सुरु होणार असुन छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

   उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०२ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) पर्यंत (सकाळी ११ ते दुपारी ३) या वेळेत असुन निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दि. ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून) रोजी असुन त्याच दिवशी अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी दाखल केंद्रनिहाय अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे – ५६५

१. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ – (प्रभाग क्र. १,२ व ५) – अर्ज दाखल संख्या – ९९

२. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ -(प्रभाग क्र. ३,४ व ६) – अर्ज दाखल संख्या – ९२

३. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ – (प्रभाग क्र. ७,८ व ९) – अर्ज दाखल संख्या – ८२

४. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ – (प्रभाग क्र. १०,११,१२ व १५) – अर्ज दाखल संख्या – १५८

५. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ – ( प्रभाग क्र. १३,१४,१६ व १७) – अर्ज दाखल संख्या – १३४

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये