ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड जिल्हा निर्मितीसाठी महिला सरसावल्या!

अप्पर चिमूर जिल्ह्यामधुन नागभीड वगळावे, एक दिवसीय धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड जिल्हा निर्मितीसाठी नागभीड जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने तालुका बंदची हाक देऊन आंदोलन केले.

नागभीड जिल्हा सर्व भौगोलिक व दळणवळनाच्या दृष्टीने सोईस्कर असून राजकीय वारसा नसल्याने चिमूर व ब्रम्हपुरीचे आमदार आपलें घोडे दामटून जिल्हा निर्मितीसाठी वातावरण तापवीत आहेत. मात्र प्रशासनाच्या दृष्टीने सिंदेवाही, ब्रम्हपुरी, चिमूर ह्या सर्व तालुक्याना समान अंतरावर असल्याने नागभीड शहर महत्वाचे आहे. नागभीड जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने दुसरा टप्पा समजून तालुक्यातील महिला यांनी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करीत अप्पर जिल्हा चिमूर येथील कामकाजातुन वगळन्यात यावे या करिता महिला धरणे आंदोलन करण्यात आले.

यामध्ये तालुक्यातील शेकडो महिलांनी भाग घेत नारे देत आंदोलन केले. तालुका दांडाधिकारी कावळे यांना निवेदन सादर केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये