ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवी. सुनील बावणे ‘झाडी शब्दसाधक’ पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट

झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर ( ग्रामीण ) व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा, वरोरा जि. चंद्रपूर तर्फे दरवर्षी  “झाडी शब्दासाधक पुरस्कार”  देऊन बोलीभाषेवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकास गौरवण्यात येते. या वर्षीचा “झाडी शब्दासाधक” पुरस्कार कवी. गझलकार श्री. सुनील बावणे यांना  देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
           दि. १० सप्टेंबर रोजी झालेल्या  झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार सुनील बावणे यांनी देण्यात आला. यावेळेस कार्यक्रमाचे उ्घाटक म्हणून विकासभाऊ आमटे, पद्मश्री परशुराम खूने यांनी हजेरी लावलेली होती, यावेळेस डॉ. विकासभाऊ आमटे यांनी आपल्या भाषणातून साहित्यिकांचे , कलावंतांचे आनंदवन वरील प्रेम व आपुलकी या बद्दल त्यांच्या प्रसंगांतून बरेच काही भाष्य केले. आनंदवन साठी  काळाची गरज विषद केली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यावेळेस उपस्थित होते व प्रमुख म्हणून सुधाकर कडू, ना. गो. थूटे, अरुण झगडकर, रत्नमालाताई भोयर, व पंडित लोंढे या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी बोलीभाषेवर उत्तम लेखन व्हावे बोलीच्या वैशिष्ट्यांचे जतन व संवर्धन व्हावे लिहीत्या हातांना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने झाडी शब्द साधक पुरस्कार दिले जातात. यावर्षीचे झाडीबोली शब्द साधक पुरस्कार निवड समितीने जाहीर केले होते. त्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे साहित्यिकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील कवी व गझलकार श्री. सुनील बावणे यांची झाडी शब्द साधक पुरस्कारसाठी निवड करण्यात आलेली होती. त्यांनी मराठी प्रमाण भाषेसोबत झाडीबोली भाषेत कविता व गझल लिखाण करून बोलीभाषेच्या संवर्धनासाठी मोलाचे कार्य केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील काही निवडक अग्रगण्य लेखका पैकी सुनिल बावणे यांचे नाव जिल्हात व जिल्ह्याबाहेर गाजत आहे. या सर्व कराची दखल घेत त्यांना “झाडी शब्दासाधक” पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये