Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या यशात पालकाचा ही मोठा वाटा – खा. प्रतिभा धानोरकर

वरोरा काँग्रेस तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

 वरोरा : गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पालकाचाही मोठा वाटा असतो, पालकांनी मुलांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करण्याची संधी द्यावी, असे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. वरोरा शहर काँग्रेस तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी व पालकांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

      मंचावर शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, डॉ. हेमंत खापने, राजेंद्र चिकटे, अनिल झोटींग इ.दी. प्रामुख्याने उपस्थित होते.

    कार्यक्रमात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील वरोरा तालुक्यातील शीर्षस्थ गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनी मुग्धा पेटकर, जान्हवी चव्हाण, विप्रल काळे, राहुल लोखंडे, अनुष्का वादाफळे, कृतिका अपराजित, आदिती हटवार, ओम कापसे, हर्षल सोनुने, वैष्णवी निवलकर, सानिका खामनकर, पियुष निरस्कर आदींचा त्यांच्या पालकासह शाल,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   पालकातर्फे गजानन हटवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात महिला काँग्रेस अध्यक्षा दिपाली माटे, माजी नगरसेवक राजेश महाजन, प्रदीप बुराण, सनी गुप्ता, सलीम पटेल, आसीफ रजा आदींची उपस्थिती होती.

 प्रास्ताविक विलास टिपले यांनी केले. संचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये