Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहुजन कल्याण विभागाच्या वतीने शिंदे महाविद्यालयात तालुकास्तरीय मेळावा

विविध योजनांची दिली माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 ऑगस्ट 2024 आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा धोटे प्रमुख पाहुणे व वक्ते शिष्यवृत्ती विभागाचे महाविद्यालयीन नोडल अधिकारी, डॉक्टर अजय दहेगावकर, श्री डी. डी. दोहतरे, प्राचार्य, कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती, श्री पी.एफ. पवार, जनसंपर्क अधिकारी, इतर बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणातून श्री पी. पी. सुरूनुसे यांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी व जनहिताच्या तसेच प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता विविध शिष्यवृत्ती योजना व त्याचा लाभ घेण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करण्यात या विषयाची विस्तृत माहिती दिले.

 तसेच श्री डी.पी. दोहतरे यांनी शिष्यवृत्ती योजने व्यतिरिक्त इतर शासकीय योजनांची माहिती सांगितली.

 तसेच महाविद्यालयीन नोडल अधिकारी, डॉक्टर अजय दहेगावकर यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना व इतर शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती योजना व त्या शिष्यवृत्ती चा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना अपेक्षित आहे या विषयाचे मार्गदर्शन केले.

 श्रीपी.एफ. पवार यांनी इतर मागास बहुजन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनेची विस्तृत प्रमाणात माहिती दिली.

तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्य डॉक्टर सौ अपर्णा धोटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांकरिता तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता शासनाच्या विविध शिष्यवृत्ती विषयी माहिती दिली.

 तसेच शासनाच्या विविध योजनेचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा ह्या उद्देशाने नेचर फाउंडेशन, नागपूर यांच्यावतीने पथनाट्याच्या सादरीकरण करण्यात आले होते.

 या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री संजय जताडे व श्री अजय आसुटकर यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये