ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सकल मातंग समाजाचा मोर्चा मुंबईकडे रवाना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मोर्चासाठी तालुक्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनुसूचित जाती आरक्षणाचा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा फायदा पाहिजे तसा झाला नाही.आरक्षणाच्या टोपलीतील फळे एक ते दोनच जातीसमूहानी खाल्ली असून शासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे. अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण ( अ ब क ड) होऊन वंचित उपेक्षित दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे तरच मांग आणि तत्सम तसेच इतर जातींना मिळणार आहे. यासाठी मुंबई आझाद मैदानावर पहिले जवाब दो आंदोलन २३ फेब्रुवारी २०२३ रोजी निघाला होता तर दुसरा मोर्चा २० जुलै,२०२३ रोज गुरूवारला जवळपास महाराष्ट्रातील लाखो संख्येसह निघणार आहे. या मोर्चासाठी दुसऱ्या दिवशी जवळपास शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत.

यात डॉ अंकुश गोतावळे, दत्ता गायकवाड, प्रा. सुग्रीव गोतावळे, भानुदास जाधव, विजय गोतावळे, रमाकांत जंगापले, जांभळे, केशव भालेराव, भगवान डुकरे, देविदास कांबळे, पांडुरंग भालेराव, संजय भालेराव, अनिल बसवंत, केदासे, पंढरी गायकवाड, अंबादास कंचकटले, वाघमारे, शाहीर तोगरे, मोरे, गायकांबळे, विजयकुमार कांबळे, यादव भालेराव, मोतेवाड, पट्टेवाले, ढगे, कोमले, पोतवळे, गजू राठोड, मेकाले, जाधव, आक्रपे, गवाले, सूर्यवंशी, गोरे, दासरे, गायमुखे, हरगीले, मोरताटे,नामपल्ले, सिकारे, भटलाडे, भोगे इत्यादी कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये