ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नायलॉन मांजा विकणाऱ्यावर भद्रावती पोलीसांची कारवाई
दहा हजाराचा माला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली.
शहरातील भंगाराम येथील स्मशानभूमी परीसरात एक व्यक्ती नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची गोपणीय माहिती भद्रावती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता तेथे गणेश नारायण कामतवार हा नायलॉन मांजाची विक्री करीत असताना आढळून आला.
पोलीसांनी त्याच्या जवळून नायलॉन मांजाच्या दहा चकऱ्या किंमत दहा हजार रुपये असा माला जप्त करून त्याचेवर संबंधीत गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली.



