ताज्या घडामोडी

एकच वादा – देवराव दादा – राजुरा विधानसभेवर भगवा फडकला

आजी माजी आमदारांना धुळ चारत देवराव भोंगळे अजिंक्य - लाडक्या बहिणींचा दादाला आशीर्वाद

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणी नंतर राजुरा विधानसभा क्षेत्राचे राज्यात प्रतिनिधित्व कोण करणार ह्याची उत्कंठा संपून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवराव भोंगळे ह्यांनी विपरीत परिस्थितीत अत्यंत नेटाने किल्ला लढवत दिमाखदार विजय प्राप्त करून आमदार पदाला गवसणी घातली असुन स्वपक्षात असलेले बंड मोडीत काढून जनतेचा प्राप्त केलेला विश्वास क्षेत्राच्या पुढील राजकारणाची नांदी ठरविणारा असेल अशी आशा भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.

आ. देवराव भोंगळे ह्यांनी अत्यंत चुरशीच्या लढाईत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते, जिल्हाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार सुभाष धोटे ह्यांना शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवुन अखेरीस आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले असुन ह्या निवडणुकीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले माजी आमदार वामनराव चटप तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे.

आज जाहीर झालेल्या ह्या निकालाने चांदा ब्लास्टच्या मतदानपूर्व भाकितावर शिक्कामोर्तब केले असुन चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी 1- 5 अशा फरकाने पराभुत झाली आहे हे विशेष.

भाकित वाचा 👇

https://chandablast.com/?p=34050

विस्तृत बातमी थोड्याच वेळात…..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये