Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैधरित्या गावठी मोहा दारू सडवा रसायन तयार करणाऱ्या आरोपी अटकेत

एकुण 4 लाख 1 हजाराचा मुद्देमाल जप्त करून नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 24/12/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील एक पथक पुलगाव डिव्हिजन परिसरातील पो.स्टे. देवळी हद्दीतील मौजा देवळी शेत शिवारातील पावर हाऊस चे मागे गावठी मोहा दारू रसायन सडवाबाबत रेड केला असता आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाल्याने मोक्यावरून एकूण 1)3,600 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, 2)लोखंडी ड्रम, भट्टी साहित्यसह असा एकूण 4,01,000/- रु. चा माल नाश करून आरोपी नामे अमर अंबादासजी तांडेकर, रा. आंबेडकर नगर, देवळी ता. देवळी जि. वर्धा याचे विरुद्ध पोलीस स्टेशन, देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

          सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, मनीष कांबळे, अमोल नगराळे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये