ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“इंडिया”आघाडीला रिपब्लिकन चेहरा नको आहे काय?

रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेन्द्र शेंडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मोठ मोठे सरकारी उद्योग विकले, खाजगीकरणाच्या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून देशातील आरक्षण संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे शिक्षणाचे खाजगीकरण करुन देशातील जनतेला शिक्षणापासून वंचित करण्याचा डाव आहे संविधान वाचविण्यासाठी लढण्याची रिपब्लिकन पक्षाची तयारी आहे देशात आंबेडकरी विचारांच्या जनतेची संख्या पाहता इंडिया आघाडीत रिपब्लिकन पक्ष असावा असे वाटते मात्र देशातील विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला रिपब्लिकन पक्षाचा चेहरा नको आहे असे दिसून येत आहे आमची भूमिका आम्ही मांडली आहे आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पक्षांच्या नेत्यांना संपर्क साधला आहे त्यामुळे आता त्यांनी आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर तसे जाहीर करावे असे रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेन्द्र शेंडे यांनी वक्तव्य केले आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा) ब्रह्मपूरी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते

या राज्यस्तरीय अधिवेशनातील पहिल्या सत्रात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात आंबेडकरी विचारवंत व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ एन व्हि ढोके यांनी रिपब्लिकन संकल्पना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले यावेळी त्यांनी प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा उभा करूया असा निर्धार व्यक्त केला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय संघटक उत्तमराव गवई, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशिक आनंद यांनी प्रबोधनपर विचार मांडले स्वागताध्यक्ष व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ देवेश कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले अधिवेशनाचे सुरुवातीला बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकात छत्तीसगड राज्याचे अध्यक्ष ओमप्रकाश मेश्राम यांच्या हस्ते निळा झेंडा ध्वजारोहण करण्यात आले.

सायंकाळी झालेल्या खुल्या अधिवेशनात काही ठराव मंजूर करण्यात आले १)जे भारतीय संविधान बदलण्याची भाषा स्वतः संवैधानिक पदावर राहून करतात त्या सर्वांवर सविधांनद्रोहाचा खटला भरण्यात यावा,२)देशातील सध्याचे शैक्षणिक धोरण हे धनदांडग्यांना मोठे करणारे आहे, त्यामुळे शिक्षणाचे राष्ट्रीयकरणं सगळयांना एक समान करण्यात यावे व शिक्षण सम्राटांना आळा घालावा ३) सरकारी उपक्रमाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे ते थांबवून शासनाच्या संपूर्ण खाजगी उपक्रमाना शासनाच्या अधिपत्याखाली आणण्यात यावे, व केंद्र व राज्य सरकारातील नौकऱ्यातील आरक्षण लागू करण्यासाठी संविधानात अमेडमेन्ट करण्यात यावे४)बेरोजगारी वाढत असल्याने तरुणांमध्ये असंतोष निर्माण होऊन अराजकतेपासून वाचवण्यासाठी रोजगार निर्माण करून आर्थिक सुरक्षा बहाल करण्यात यावी व नौकरभरती चा कार्यक्रम कालबद्ध व कठोरपणे राबविण्यात यावा५)देशामध्ये अल्पसंख्याक समुदायाला भयभीत करून असुरक्षित करीत आहेत त्याच उदाहरण म्हणजे संसदेत अल्पसंख्याक समाजाच्या लोकप्रतिनिधी ला सत्तारूढ पक्षाचा खासदार अपशब्दात असविधानिक भाषेचा वापर करून सर्वसमाजला वेठीस धरतो त्याचा निषेध करून त्यावर देशद्रोहाखाली कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे६) भारतीय सविधांनद्रोह सत्तारूढ सरकार कडून करण्यात येत आहे.

त्याविरोधात धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवनारे जे पक्ष “इंडिया आघाडी”एकत्रित आले आहेत त्या प्रवाहात सन्मानपूर्वक सहभागी होण्याची भूमिका खोरीपा ने घेतली आहे७)डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे ध्येय धोरण प्रामाणिकपणे उतरविण्यासाठी बॅ राजाभाऊ खोब्रागडे यांनी प्रयत्न केले आहे यांच्या विचारधारेवर सशक्त पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे ठरावा चे वाचन प्रा डॉ एन व्ही ढोके यांनी केले व सर्वांच्या साक्षीने टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले व पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस देशक गिरीशबाबू खोब्रागडे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रा अशोक ढोले, उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख,सी एम रामटेके, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके, विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा संघमित्रा खोब्रागडे,मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दिगंबर वाकोडे, आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सत्यजित खोब्रागडे,छत्तीसगड राजनांदगाव महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा वासनिक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद साळवी, नागपूर प्रदेश अध्यक्ष राजू गजभिये, सरचिटणीस आनंद वानखेडे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,संघटक सलीम सय्यद,नांदेड जिल्हा अध्यक्ष अरुण कांबळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष मुन्ना भाऊ खोब्रागडे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे, आणि प्रशांत डांगे,पद्माकर रामटेके, नरेश रामटेके, डेव्हिड शेंडे,विजय पाटील, विजय वालदे,देवानंद कांबळे,मिलिंद रंगारी, गोपाळराव खोब्रागडे, राजू मेश्राम, भारत मेश्राम, रक्षित रामटेके, मनोज धनविजय,आदीनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा.मालाताई कांबळे यांनी तर खुल्या अधिवेशनाचे संचालन प्रा सरोज डांगे यांनी केले हया” प्रसंगी वादळ निळ्या क्रांतीचे” भिम गीतांचाकार्यक्रम सादर करण्यात आला अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये