ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंदू ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपुर व्दारा आयोजित तालुका व जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये हिन्दु ज्ञान मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यात बुद्धीबळ स्पर्धा U-14 गटामध्ये स्वरित चौधरी व कु. दिव्या ठाकरे जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र व U-17 गटात कु.मनस्वी ठेंगरी ही विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली.

कराटे स्पर्धेमध्ये U-14 गटामध्ये कु. लक्ष्मी आळे व U-17 गटात काशीफ शेख जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेत.
मैदानी स्पर्धेमध्ये 400 मीटर दौड प्रथम- मेघशाम प्रधान, 800 व 1500 मीटर दौड प्रथम – प्रणय उपासे, 5000 मीटर चालने व्दितीय- चैतन्य नवलाखे,

लांबउडी मध्ये व्दितीय -प्रज्वल चौधरी व प्रणय उपासे, गोळाफेक मध्ये प्रथम -रूची ठेंगरी व व्दितीय -कु. युती लांजेवार, तिहेरी उडी प्रथम -मेघशाम प्रधान, 4×400 मीटर रीले स्पर्धेमध्ये U17 संघाचा प्रथम व कबड्डी U-17 संघाचा प्रथम त्याच प्रमाणे U19 गटात दिप जिभकाटे भालाफेक मध्ये प्रथम व थाळीफेक मध्ये व्दितीय वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

स्पर्धेतील यशाकरिता संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळतील अध्यक्ष श्री. कहारे सर व सचिव श्री. चौरीकर सर व सर्व सभासद शाळेच्या मुख्याध्यापिका सैय्यद मॅडम, पर्यवेक्षीका सौ.काळे मॅडम, जेष्ठ शिक्षीका श्रीमती श्रीरामे मॅडम, शारीरीक शिक्षिका कु घोरमोडे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कैतुक व अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये