Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कळमगावची शेतकरी कुटुंबातील राणी लागली शासकीय सेवेत

चंद्रपूर न्यायालय मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर झाली निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

       चिमूर तालुक्यातील कळमगाव (नेरी) येथील शेतकरी कुटुंबातील राणी सुखदेव चौधरी हिची न्यायालय कनिष्ठ लिपिक पदाच्या निवड प्रकियेत निवड झाली असल्याने कुटूंबासह गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन अनेकांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. कळमगाव येथील खैरे कुणबी समाजातील सुखदेव चौधरी यांना अल्प शेती असून अल्पभूधारक आहे. त्यांनी शेती व्यवसाय सोबत उदरनिर्वाह करीत राणी ला नागपूर येथे शिक्षण दिले.

        न्यायालय अंतर्गत कनिष्ठ लिपिक भरती नुकतीच परपडली. या भरती मध्ये राणीने उंच भरारी घेत निवड झाली असून चंद्रपूर न्यायालय मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली आहे.

         कु. राणीच्या या निवडीबद्दल खैरे कुणबी समाजातर्फे व चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये