ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवून दारूच्या अमलाखाली मोटारसायकल चालवीणारे आरोपीतावर वाहतूक पोलिसांची कार्यवाही

गुन्हा दाखल व मोटारसायकल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि 11/12/25 रोजी दुपारी 12/00 वाजेच्या दरम्यान वनमाळी मेडिकल समोर वाहतूक पोलीस अंमलदार हे वाहतूक ड्युटी करीत असताना एक मोटार सायकल चालक त्यांना वेड्यावाकड्या पद्धतीने अतिवेगाने बेदरकार पणे वाहन चालवीतना दिसला त्यास थांबवून त्याचे नावं गाव विचारले असता तो दारूच्या नशेत उडवाउडवीचे उत्तर देवू लागला त्यास पोलिसांनी ड्रायव्हिंग लायसेन्स व गाडीचे कागदपत्र मागणी केली असता.,

गाडी घेवून पळून जायचा प्रयत्न करू लागला त्यावरून त्याचे दारू पिल्याचे मेडिकल तपासनि केली असता त्याने दारूचे सेवण केल्याचे व दारूच्या अमलाखाली असल्याचे त्याच्या रक्तात 292 mg दारू मिळून आल्याने गाडीचालक आदित्य रामू मेश्राम वय 26 वर्ष रा मदणी ता आर्वी जि वर्धा याच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185, 3/181 मोटार वाहन कायदा कलमनवये गुन्हा नोंद करण्यात आला तसेचतो चालवीत असलेले मोटारसायकल नंबर mh 40 J 8007 हे जप्त करण्यात आले आहे, सदर चालकावर कायदेशीर कार्यवाही वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा चे आमलदार 1) Asi शब्बीर सय्यद b.no.814 2)प्रदीप कोहळे b.no 983 यांना मिळून कलम 185 मोवाका प्रमाणे तसेच कलम 3/181 प्रमाणे कार्यवाही पो. स्टे. वर्धा शहर येथे करण्यात आली आहे.

वाहन चालकांनी आपले वाहन दारू पिवून चालवू नये असे आवाहांन वाहतूक शाखे कडून करण्यात आलेले आहे.

पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये