तालुका देखरेख चंद्रपूर व बल्लारपूर गटसचिवांच्या वतीने दिनेश चोखारे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा देखरेख सहसंस्था तालुका चंद्रपूर व बल्लारपूर गटसचिवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश चोखारे यांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बँकेचे विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार, बँकेचे निरीक्षक रोशन तुरारे, शाखा सचिव किशोर लोणगाडगे, गटसचिव सुरेश लानोरे, तसेच गोपीचंद शेंडे, कृष्णा देवाळकर, प्रमोद मत्ते, प्रवीण अटकारी, रुपेश येडे, प्रकाश माकोडे, चंद्रकांत पहानपटे, दिनेश शेरकी, प्रवीण शेरकी, संतोष मोहजे आणि स्वप्निल कपाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की गटसचिव हा बँक व शेतकरी यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. कर्ज वितरण, बँक योजनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत तो अत्यंत मोलाची भूमिका पार पाडतो. त्रिस्तरीय सहकारी व्यवस्थेतून कार्य करताना शेतकऱ्यांच्या प्रगतीशी एकनिष्ठ राहणे व त्यांना सातत्याने सहकार्य करणे हीच गटसचिवांची खरी जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.



