ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या रेल्वे समस्या सोडवा – आ.  जोरगेवार

रेल्वे आंदोलनाचा मुद्दा आ. जोरगेवार यांनी मांडला अधिवेशनात

चांदा ब्लास्ट

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील सुरू असलेल्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रवाशांच्या सर्व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी हा प्रश्न सभागृहात पुन्हा मांडत राज्य सरकारने या मागण्यांचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे तातडीने करावा अशी मागणी केली.

सभागृहात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी संख्या प्रचंड आहे. विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक तसेच उद्योग क्षेत्राच्या वाढत्या गरजांमुळे रेल्वे सुविधांचा विस्तार अत्यावश्यक झाला आहे. त्यामुळे या मागण्या केवळ प्रवासी संघटनांच्या नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या आहेत.

यावेळी त्यांनी चंद्रपूर–मुंबई दैनंदिन सुपरफास्ट सेवा, चंद्रपूर–नागपूर शटल सेवा, गोंदिया दुरंतो एक्स्प्रेसची सुरुवात चंद्रपूरहून करण्याची गरज, तसेच चंद्रपूर–कोलकाता अशी चंद्रपूरची माता महाकाली ते कलकत्ता ची महाकाली थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. या सर्व मागण्या जनहिताच्या असून तातडीने अमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार जोरगेवार यांनी राज्य सरकारला या मागण्या त्वरित केंद्र शासनाकडे पाठवून चंद्रपूरकरांच्या दीर्घकालीन अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.

“चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्यात आयरन-आधारित मोठा उद्योग उभारा — आ. किशोर जोरगेवार

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की या परिसरात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता असून याचा व्यापक फायदा स्थानिक विकासाला होणार आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये आयरन-आधारित मोठा उद्योग उभारण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

ते म्हणाले,

            चंद्रपूरचे भौगोलिक स्थान, खनिजसंपत्ती आणि उपलब्ध संसाधने पाहता आयरन उद्योगासाठी हा भाग सर्वाधिक उपयुक्त आहे. असा उद्योग उभा राहिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल आणि या भागात औद्योगिक वाढीस मोठे चालना मिळेल. या विषयात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी सभागृहात केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये