अभिषेक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली (खुर्द) येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून मालाअर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगद गायकवाड यांनी भारतरत्न,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेतील विद्यार्थिनी कु.अंकिता कांबळे, कु.नंदिनी सूर्यवंशी,कू.पायल कांबळे इत्यादी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, इ.कार्यक्रमामधे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गेडाम यांनी केले तर आभार ए.के.लदाफ (शेख) यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अविनाश गेडाम, सुभाष राठोड, मुर्किकर,एफ. एम.पठान,वाघमारे यांनी परिश्रम घेतले.



