पालकांनी आपल्या पाल्याविषयी सतत जागृत राहावे _ प्राचार्य डॉ. अनिल चिताडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे शिक्षक पालक सभा बुधवारी पार पडली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे माजी सचिव तथा संचालक तसेच शाळा समितीचे अध्यक्ष राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ अनिल चिताडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे सचिव श्री धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका सौ माधुरी मस्की, शिक्षक पालक संघाचे सदस्य श्री महादेव बोभाटे, पूजाताई देवतळे उपस्थित होत्या
26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉ अनिल चिताडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आपल्या पाल्याविषयी पालकांनी सतत जागरूक असले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक पालक संघाचे सचिव प्रा बाळू उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हरिहर खरवडे यांनी केले.
कार्यक्रमाला शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



