ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत विश्वशांती विद्यालयाचे घवघवीत यश

एकूण तीन बक्षिसांचे मानकरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

पंचायत समिती सावली (शिक्षण विभाग) द्वारा ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भैय्याजी पाटील भांडेकर हायस्कूल कापसी येथे आयोजित करण्यात आलेले होते.त्यात सावली पंचायत समिती अंतर्गत एकूण १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविला त्यात वर्ग ६ ते ८ (दिव्यांग विभागात) तालुक्यातून प्रथम क्रमांक तसेच वर्ग ९ ते १२ (दिव्यांग विभागात) तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान सावली तालुक्यातील नामांकित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाने मिळविला असून त्याचबरोबर वर्ग ६ ते ८( गैर आदिवासी) विभागात तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून अनेक मान्यवरांनी त्यांचे भरभरून अभिनंदन केले. सहभागी दिग्यांग विद्यार्थ्यांमध्ये टीम गंडाटे, कु. श्रेया खोबे,उत्कर्ष मसरकोल्हे, अंशूल कोटरंगे सहभाग होता.तर गैर आदिवासी प्रतिकृती मध्ये केतन भोयर आणि ओम भोयर यांचा समावेश होता सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे विज्ञान शिक्षक प्रथमेश वारजुरकर, शिक्षिका प्रनोती सोनुले,धनंजय गुरनुले, भुजंगराव आभारे यांचे सहकार्य लाभले.

विज्ञान प्रदर्शनी मधील यशाबद्दल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वैभव खांडरे,विस्तार अधिकारी किशोर बारसागडे,केंद्रप्रमुख लोमेश बोरेवार,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,शाळा समितीचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे,समस्त पालक वर्ग,शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये