ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराची आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे केली तक्रार

शिक्षकांच्या समस्या सुटतील का? याकडे सर्वांचे लागले लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पंचायत समिती कोरपणा अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या भोंगळ कारभाराची आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे पंचायत समितीचे लिपिक हे सेवानिवृत्त शिक्षकांना अर्वाच्या भाषेमध्ये बोलतात तसेच अंश राशी करण गट विमा आणि सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम महागाई भत्त्यात झालेली वाढ अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे शिक्षण विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.

याबाबतच्या तक्रारी वारंवार वरिष्ठांना देऊन देखील संबंधितांच्या वर्तनात काही परिवर्तन दिसून येत नाही म्हणून चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा कोरपनाचे अध्यक्ष एन जी फरताडे व सचिव पांडुरंग करनुजी बुरांडे उपाध्यक्ष वासुदेव गौरकार व मांचालवर सर व त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या आहेत. शिक्षकांच्या समस्या सुटतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये