
चांदा ब्लास्ट
महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. राज्यघटना ही १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,आशिष जीवतोडे,सारंग निर्मळे,डॉ. नरेंद्र जनबंधू,गुरुदास नवले,वासंती बहादूरे,विलास बेले,मनीषा नैताम,ग्रेस नगरकर,शारदा भुक्या तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



