भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा – धनंजय गुरनुले
विश्वशांती विद्यालयात संविधान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे जो देशाच्या कारभारासाठी मूलभूत चौकट आणि नियम ठरवितो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने हे संविधान तयार केले.जे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.ज्यात नागरिकांचे मूलभूत अधिकार,मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य यांचा समावेश आहे असे कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे शिक्षक धनंजय गुरनुले बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि आणि भारतीय संविधानाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे ,ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,सहाय्यक शिक्षक किशोर संगीडवार,शेखर प्यारमवार,श्वेता खर्चे उपस्थित होते. संविधान दिनाच्या महत्त्वावर शालेय विद्यार्थांनी भाषणे आणि गीत सादर करीत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. त्यानंतर संपूर्ण सावली नगरातून प्रभात फेरी काढण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक राजू केदार यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक राहुल आदे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.



