जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अपघात विमा क्लेम रक्कमेचे वाटप

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार होणारे जिल्हयातील १०६४३ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा “सीडीसीसी बैंक सॅलरी पॅकेज” अंतर्गत प्रत्येकी रु.३०.०० लाख था अपघात विमा बँकेतर्फे काढण्यात आलेला आहे. जि.प. परीसर शाखेअंतर्गत पगार घेणारे (१) उप अभियंता (यांत्रिकी) जिल्हा परीषद, चंद्रपुर, सहाय्यक आवेदक मोहन सोमाजी दोहतळे यांचा दि.११.०४.२०२५ रोजी दुर्दैवाने अपघाती मृत्यु झाला. (२) नागभीड शाखे अंतर्गत पगार घेणारे जिल्हा परीषद शाळा सुलेशरी येथील शिक्षक मनोजकुमार आत्माराम मेश्राम यांचा दि.०५.०७.२०२५ रोजी दुर्देवाने अपघाती मृत्यु झाला. बँकेचे सीडीसीसी बैंक सॅलरी पॅकेज अंतर्गत बँकेच्या प्रमुख कार्यालयात बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र श्रीनिवासराव शिदि यांचेहस्ते स्वर्गीय मोहन सोमाजी दोहतळे यांची वारस पत्नी श्रीमती जोत्सना मोहन दोहतळे व स्वर्गीय मनोजकुमार आत्माराम मेश्राम यांची वारस पत्नी श्रीमती मालती मनोज मेश्राम यांना रु.३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यात आली
याप्रसंगी बँकेच्या उपाध्यक्ष महोदय श्री. एस.जी. डोंगरे व संबालक महोदय श्री.एस.बी. निमकर, श्री.यु.एन. करपे, श्री.डी.एस. मिसार, श्री.व्ही.ए. मोगरकर, श्री.डॉ.एल. के. मोटघरे, श्री.आर.सी. बोम्मावार, श्री. एन. आर. बोरकर, श्री. वाय.टी. दिघोरे, श्री.जे.एम. टेमुर्डे व मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी उपस्थित होते.



