ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आनंद निकेतन महाविद्यालय वरोऱ्याच्याच्या वेदीका भोयरला राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पूणे अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा २०२५

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पूणे अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा बारामती (पूणे) येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडली.

             या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील नागपूर, अमरावती, पूणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर विभागाच्या खेळाडूंचा सहभाग होता. या सर्व विभागीय खेळाडूंना मात देत, वरोरा येथील फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर ची कराटे खेळाडू आणि आनंद निकेतन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वेदीका भोयर हीने आपल्या उत्तम कौशल्याचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकाविले.

तसेच कनिष्ठ गटात किरण गोचे हीने सिल्व्हर मेडल तर सानिया आवरी हिने ब्रांझ मेडल पटकावून फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा चा नावलौकिक वाढविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.

सुवर्णपदक विजेत्या वेदीका भोयर ची निवड, राष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. स्पर्धा स्थळी फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा चे मुख्य प्रशिक्षक श्री रवींद्र चरूरकर यांनी खेळाडूंना कोच म्हणून योग्य मार्गदर्शन करून विजयश्री खेचून आणली.

राज्यस्तरिय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत फौजी वॉरिअर्स च्या विद्यार्थिनींनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल, फौजी वॉरिअर्स मार्शल आर्ट सेंटर, वरोरा चे अध्यक्ष श्री. प्रविण चिमुरकर (बी. एस. एफ.) समन्वयक, श्री डी.एन. खापने सर (भा. वायू सेना), सचिव श्री रवि तुराणकर सर (भा. स्थल सेना ), गुरुवर्य श्री राजू नकवेजी आणि मास्टर वैभव खारकर, तसेच शहरातील क्रिडाप्रेमी वर्ग, शिक्षक वर्ग आणि पालकवर्ग यांनी खेळाडूंच्या प्रशंसनीय कामगिरी चे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये