ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक भूमिकेला यश

चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि महामार्ग प्राधिकरणाला खडसावल्यानंतर, अखेर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर येथीलअधीक्षक अभियंता यांना पत्र लिहून चंद्रपूर-नागपूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून , पावसाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली होती. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच यामुळे भविष्यात मोठे अपघात होऊन जीवतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने अखेर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाऊले उचलली आहेत. दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, जोपर्यंत रस्त्याची गुणवत्ता सुधारत नाही आणि महामार्ग पूर्णपणे सुस्थितीत येत नाही, तोपर्यंत प्रशासनावर दबाव कायम ठेवला जाईल, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने देण्यात आली आहे. जनतेच्या हितासाठी खासदार प्रतिभा धानोरकर कटिबद्ध असून, लवकरच हा महामार्ग अपघातमुक्त आणि सुस्थितीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये