डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एनसीसी दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्य 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपूरच्या पत्रानुसार एनसीसी विभागातर्फे महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सैनिक दिवस साजरा दिवस आला. त्या अनुषंगाने महाविद्यालयात एनसीसी युनिट च्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्यावतीने राष्ट्रीय छात्र सैनिक दिवस 23 नोव्हेंबर ला साजरा करण्यात आला .विविध उपक्रमाची सुरुवात सर्वप्रथम एनसीसी युनिट च्या छात्रांना शपथ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध उपक्रमामध्ये एनसीसीच्या इतिहासा वर आधारित निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा त्याचबरोबर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या स्पर्धेकरिता ब्रह्मपुरी पब्लिक स्कूलचे प्राचार्य रिमा कांबळे उपप्राचार्य अमल मेश्राम यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. तर परिसरात वृक्षारोपण करते वेळेस संस्थेचे सदस्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. स्निग्धा कांबळे तर मराठी विभागाचे प्राध्यापक वैभव गोसाpवी तसेच एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक सरोज शिंगाडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव डॉक्टर देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरित्या उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमामध्ये छात्र सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यानंतर छात्र सैनिकांनी राष्ट्रीय कॅडेट स्कोर ची माहिती समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचावी या हेतूने समाज जागृती पर रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर रॅली महाविद्यालयातील निघून पोलीस वसाहत,शारदा कॉलनी, गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, तसेच शहराच्या मुख्य रस्त्याने जनजागृती पर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये देशाभिमान जागृत करणाऱ्या व राष्ट्रीय सैन्य तुकडी असलेल्या राष्ट्रीय छात्र सैनिक दिनाच्या निमित्ताने भारत माता की जय राष्ट्रीय कॅडेट कोर्स जिंदाबाद अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली.
एनसीसी दिनानिमित्त विविध उपक्रम एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक सर्व शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले यावेळेस 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या 50 छात्रा उपस्थित होत्या.



