ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नाशिक येथील 1800 झाडांची कत्तल त्वरीत थांबवा _ पर्यावरण प्रेमी ची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नाशिक येथील आयोजित कुंभमेळावा साठी 1800 झाडांची तोड करू नये, पर्यावरण च्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणार असल्याने प्रशासनाने झाडांची कत्तल करू नये अशी मागणी देऊळगाव राजा येथील पर्यावरण प्रेमींनी वन व महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे,
निवेदनावर सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे, वनश्री जनाबापू मेहेत्रे ,सेवानिवृत्त वनक्षेत्र पाल जगन्नाथ डोईफोडे, दुर्गेश बनकर, ज्ञानेश्वर सुसार, बबनराव नागरे, डॉ अरुण डोईफोडे, एकनाथ खेडेकर, अरविंद खांडेभराड, नामदेव मगर यांच्या स्वाक्षऱ्या आहे.



