आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे मिलिंद अष्टीवकर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.. आपण आपल्या प्रवेशिका विभागीय सचिवांमार्फत किंवा थेट परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्याकडे 8 डिसेंबर 2025 पर्यत पाठवायच्या आहेत.. 14 डिसेंबर 2025 रोजी देवडी येथील माणिकबागेत होत असलेल्या परिषदेच्या बैठकीत पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल असे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्या नाहीत तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल..स्थळ नंतर जाहीर करण्यात येईल.. फक्त परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांनाच हे पुरस्कार दिले जातात याची सर्वांनी नोंद घ्यावी.. पत्रकार संघ करीत असलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केले जाणारे कार्यक्रम, परिषदेच्या उपक्रमातील सहभाग,परिषदेची वर्गणी नियमितपणे दिली जाते की नाही, निवडणुका नियमित होत आहेत की नाही? आदि बाबींचा हे पुरस्कार देताना विचार केला जातो..प्रवेशिका पाठवताना संघाने केलेल्या कामाची माहिती तसेच बातम्यांची कात्रणं, फोटो पाठविणे आवश्यक आहे.
यावर्षी पासून डिजिटल मिडिया परिषदेच्या तालुका शाखांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.. डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखांनी आपल्या प्रवेशिका डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे (मो.98225 48696) यांच्याकडे पाठवायच्या आहेत.. आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांना मोठी प्रतिष्ठा असल्याने जास्तीत जास्त संघांनी आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केले आहे.



