ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस नगर परिषद निवडणूक 2025

उमेदवारी माघारीने गरमली राजकीय पिच, 14 जणांनी घेतला माघार!

चांदा ब्लास्ट

घुग्घुस :— नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी (21 नोव्हेंबर 2025) घुग्घुसमध्ये प्रचंड राजकीय गदारोळ बघायला मिळाला. विविध पक्षांचे दिग्गज नेते स्वतः उमेदवारी माघारी घ्यावी की नाही, कोणाला माघारी घ्यायला भाग पाडावे, कोणाला उभे ठेवावे… या सगळ्या नाट्यमय ‘जद्दोजहद’मध्ये दिवसभर धावपळ करताना दिसले.

निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार एकूण 142 उमेदवारांपैकी तब्बल 14 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यातील अनेक अपक्ष उमेदवारांनी ‘व्यक्तिगत कारणे’ दाखवून माघार घेतली असली, तरी शहरात मात्र त्यामागे राजकीय दबाव, डील, आणि गुप्त चर्चांचे जोरदार किस्से फिरताना दिसत आहेत.

नेत्यांच्या दबावामुळे माघारी?

शहरभर चर्चेत असलेल्या माहितीनुसार काही पक्षीय दिग्गजांनी रात्रंदिवस फिरून काही अपक्ष उमेदवारांना माघारीसाठी ‘मनवण्याचा’ प्रयत्न केला.

काहींना आश्वासने, काहींना धमक्या, तर काहींना भविष्यातील राजकीय हित सांगून बाजूला सारण्यात आल्याचे आरोप नागरिकांमध्ये जोरात आहेत.

निवडणुकीपूर्वीच उमेदवारांची अशी ‘कापाकापी’ सुरू झाल्याने मतदार नाराजी व्यक्त करत आहेत.

उमेदवार गोंधळलेले, जनता नाराज

एकीकडे राजकीय नेते आपापली गोटं मजबूत करण्यासाठी मैदानात उतरत असताना, दुसरीकडे सामान्य नागरिक या ‘बॅकडोअर’ राजकारणावर संताप व्यक्त करत आहेत.

“इतका दबाव, इतक्या डील्स… मग लोकशाही कुठे राहिली?” असा प्रश्न मतदार विचारताना दिसत आहेत.

25 नोव्हेंबरला चिन्हवाटपासाठी उमेदवारांची नजर

आता सर्वांची नजर 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या चिन्ह वितरणावर खिळली आहे.

घुग्घुसमध्ये यंदाची निवडणूक आधीच तापलेली असताना, माघारीनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणांमुळे संघर्ष अधिक तीव्र होणार हे स्पष्ट झाले आहे.

राजकीय प्रदूषण वाढतच!

उमेदवारी माघारीच्या दिवशीचा गोंधळ, दबाव, नेत्यांची धावपळ, आणि अनपेक्षित माघारी—

सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत राजकीय प्रदूषणाचा स्तर अजून वर नेला आहे.

लोकशाहीचा सन्मान राखण्यापेक्षा सत्तेची समीकरणे जुळवण्याची स्पर्धा सुरु असल्याची कडू टीका नागरिकांकडून होत आहे.

घुग्घुसचे राजकारण आता पूर्णपणे ‘हाय व्होल्टेज मोड’मध्ये गेले असून, पुढील काही दिवसांतील हालचाली निर्णायक ठरणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये