प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनी संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव व प्राचार्य डॉ. अनिल मुसळे यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच परीक्षक म्हणून गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेश डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर विज्ञान प्रदर्शनी मध्ये डॉ. अनिल मुसळे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान कृतीचे मूल्यमापन करून प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. राजेश डोंगरे यांनी सुद्धा विज्ञान कृतीचे परीक्षण व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका संगीता बल्की, प्रास्ताविक प्रा. विकास दुर्योधन तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश लालसरे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून प्रा. स्वप्निल डुमोरे यांनी जबाबदारी पार पाडली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापिका देवतळे मॅडम, प्राध्यापिका बावणे मॅडम,मुसळे मॅडम, प्रा. बोभाटे, प्रा. बांगडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



