ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुसळधार पाऊस आणि वादळात पैलवानांच्या समर्थनार्थ केले आंदोलन

ब्रिजभूषण सिंग ला अटक करा : चंद्रपूर नागरी संघाची मागणी

चांदा ब्लास्ट :

आज 10 जून 2023 रोजी चंद्रपूर येथील सर्वपक्षीय व सर्वदलीय गटाने चंद्रपुर नागरिक संघाच्या बॅनरखाली देशातील खेळाडू मुलींना न्याय द्या, अत्याचारी ब्रिजभूषणला अटक करा, अशी बॅनरबाजी करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून जटपुरा गेट पर्यंत मानवी साखळी करून आपला रोष दाखवून कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ निदर्शने व निषेध केला.
आंबेडकर पुतळ्यापासून सायंकाळी 5.30 वाजता सुरू झालेले आंदोलन अचानक पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अधिक चर्चेचा विषय ठरले. 500 हून अधिक लोक हातात फलक घेऊन जटपुरा गेट पर्यंत उभे होते, ज्यांना चंद्रपूरच्या येणाऱ्या-जाणाऱ्या जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. सायंकाळी 7.30 वाजता जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली. कोणत्याही घोषणाबाजीशिवाय शांततेत चाललेले हे आंदोलन पूर्णत: यशस्वी झाले असून, पैलवानांना लवकर न्याय न मिळाल्यास मोठ्या जनसमर्थनाने आंदोलन करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये