ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृध्दी महामार्गालगत होत असलेले जनावर चोरीचे तसेच जिल्ह्यातील ईतर जनावर चोरीची टोळी जेरबंद

९ गुन्हे उघड करून १३ लाख २९ हजाराचा माल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मागील काही महिन्यांपासून वर्धा जिल्हयातील समृद्धी महामार्ग लगत असलेल्या शेतीतील कोठ्या मधिल बैल चोरीचे प्रमाण वाढले होते या घटनेस मा. नूरूल हसन सा. पोलीस अधिक्षक वर्धा यांनी गांभीर्याने घेत या चोऱ्या बाबत संपूर्ण आढावा घेत समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंग वाढवून पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना स्थानिक गुन्हे चे पथक यासाठी नेमण्यास सांगण्यात आले यावरून सदर चोरी सह पो.नि संतोष दरेकर हे पथकासह या बाबत तपास करताना समृद्धी वरील वायफळ नागपुर ते जालना पर्यंत सर्व टोल नाके चेक करुन सर्व वाहनानं वर बारकाईने नजर ठेऊन व जनावर चोरी करणाऱ्या टोळ्यानं वर बारकाईने नजर ठेवण्यात आली.

व तांत्रिक व मिळालेल्या विश्वसनीय माहिती वरून नागपुर भिवापुर येथुन 1)अजय धनराज चैधरी, वय- 27 वर्षे, 2) अतुल धनराज चैधरी वय 29 वर्षे, 3) गुंडेराव आंनदराव दडमल, वय- 25 वर्षे, दोन्ही रा. नागतरोडी जि. नागपुर 4) कुदन गब्बर गोयल, वय- 22 वर्षे, रा. निष्टी ता. पवणी जि. भंडारा 5) सुनिल बारसु सावसाखळे, वय- 22 वर्षे, 6) स्पनिल शंकर आ़त्राम वय- 22 वर्षे, यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून विचारपुस केली असता त्यानी सदर चोऱ्या या केल्याची कबुली दिली व त्यांचे कडुन गुन्ह्यात वापरलेली वाहन 1) बुलेरो पिकअप गाडी क्र MH 40 बीएल 0722कि. 6,00,000/-रू.2) बुलेरो पिकअप गाडी क्र एमएच 40 CD 2335 कि. 6,00,000/-रू.3) आरोपीने गुन्हयात वापरलेले 5 मोबाईल कि. 59,000/-रू. 4) बैल विक्रीचे नगदी 70,000/-रू. एकुण 13,29,000/-रू. असा मुद्देमाल जप्त करुन पोलीस स्टेशन सिंधी रेल्वे, सेलू, पुलगाव, कारंजा, सावंगी गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

सदर तपासा मध्ये अजुन गुन्हे उघड होऊन अजुन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे सदर कारवाई ही मा. नूरूल हसन सा. पोलीस अधीक्षक वर्धा, मा. सागर कावडे सा. अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे मार्गदर्शनात संजय गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, संतोष दरेकर सह पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, स.पो.नि वंदना सोनूने ठाणेदार सिंधी रेल्वे, पो.उप नि सोनपितरे,शिवकुमार परदेशी, पोलीस अमांलदार संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, नापोका विकास अवचट,संघसेन कांबळे,दिनेश बोथकर,राकेश अष्टनकर, राजेश जयसिंगपुर स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये