कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे अंतर्गत उपबाजार मुर्सा येथे शासकीय आधारभूत दराने सी.सी.आय. कापुस खरेदीला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मुर्सा येथील मे. गौरीनाथ ऍग्रो प्रॉडक्ट प्रा .लिमिटेड मुर्सा येथे आज दिनांक १४ नोव्हे. रोज शुक्रवारला शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. मुहूर्ताच्या एफएक्यु दर्जाच्या कापसाला ७९४७ रुपये दर यावेळी देण्यात आला. आधारभूत दराने खरेदीच्या प्रारंभाप्रसंगी सहाय्यक निबंधक चंद्रशेखर बोदड सहकारी संस्था भद्रावती व बाजार समिती, भद्रावतीचे सभापती राजेंद्र डोंगे यांच्या हस्ते काटा पूजन करून कापूस विक्रीसाठी आणणारे शेतकऱी सुखदेव भगत शेणगाव, बाळकृष्ण नवले मुर्सा, निरंजन बोढे महाकुर्ला, रविंद्र आवारी घोनाड, नंदकिशोर वासाडे धानोरा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पहिल्या दिवशी १२६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे, संचालक परमेश्वर ताजणे, सहाय्यक निबंधकचे सहकार अधिकारी, सुनिल पांडे तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह सी.सी.आय. भद्रावतीचे केंद्रप्रमुख नीलकंठ अकोटकर, मे. गौरीनाथ ऍग्रो प्रॉडक्ट प्रा. लिमिटेड मुर्साचे संचालक अशोक हरियाणी, सागर हरियाणी यांची उपस्थिती होती. आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी ,संजय शेंडे, प्रवीण राहुलगडे , रोहित शेडामे मापारी गणेश नागोसे यांनी सहकार्य केले. (भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी सी.सी.आयला दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी ऑनलाइन नोंदणीसाठी मोबाईल प्ले स्टोअरवरून किसान ॲप डाऊनलोड करावे, किसान ॲप डाऊनलोड केल्यानंतर कापूस विक्रीसाठी आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला अप्रोल देण्यात येईल व त्यानंतर आपल्याला किसान ॲपवर मेसेज येईल.
किसान ॲप्स ओपन करून स्लॉट बुकिंग करणे आवश्यक आहे. असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे, उपसभापती सौ. अश्लेषा भोयर (जीवतोडे) व सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.



