भ्रष्टाचाराचे केलेले आरोप निराधार
माजी अध्यक्ष आनंद मेश्राम यांची पत्र परिषदेत माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील आष्टा वाल्मिकी मच्छीमारी सहकारी संस्थेमध्ये माजी अध्यक्ष आणि सचिवाने मिळून भ्रष्टाचार केला. असा जो आरोप विरोधकांनी केला. तो आरोप पूर्णतः निराधार व खोटा असल्याचे माजी अध्यक्ष आनंदराव मेश्राम यांनी आयोजित पत्र परिषदेत सांगितले.
संस्थेचे माजी सचिव दिवाकर गोहने यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष आनंदराव मेश्राम आणि सचिव सुरज भोयर यांनी मिळून विविध कामातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. हा आरोप पूर्णतः. बिनबुडाचा, खोटा आणि बदनामी करणारा असल्याचा आनंदराव मेश्राम यांनी पुराव्यासह पत्रपरिषद सांगितले. पार पडलेल्या आमसभेत अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयाची माहिती ७ दिवसाच्या आधी देणे बंधनकारक असते. परंतु आरोप करणाऱ्यांनी ही माहिती दिली नसल्याने त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे पुरावे असे देता आली नाही.
मात्र यासंदर्भात आमच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्यासह माहिती उपलब्ध आहे. त्यात माजी सचिव स्वर्गीय मारोती भोयर यांचे ४० हजार रुपयांचे मानधन न दिल्याचा आरोप तसेच नवीन कार्यकारणीनंतर १० जून २५ ला १लाख २०हजार बँकेतून काढल्याचा आरोप केला.त्यात काही तथ्य नसून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक चंद्रपूर यांचे२१ एप्रिल २५च्या पत्राचे आदेशानुसार आम्ही पैसे काढल्याचे मेश्राम यांनी यावेळी सांगितले.अतिवृष्टीमुळे तलावातील मासे आणि बीज वाहून गेले. त्याचे संस्थेला ४लाख २१ हजार अनुदान मिळाले.
या पैशातून नव्याने मासे बीज घेण्यात आले असून त्याचे खरेदी बिल, मासेबीज संचयाचे छायाचित्रासह पुरावा आमच्याकडे आहे.असे यावेळी मेश्राम यांनी सांगितले चालू आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२४ ते ३१मार्च २०२५ चे आहे. त्यानंतरचे विषय असल्याने आमसभेत पुरावे सादर करता आले नसल्याचे शेवटी आनंद मेश्राम यांनी सांगितले. पत्रपरिषदेला सचिव सुरज भोयर,माजी अध्यक्ष आनंद मेश्राम, रमेश पोहनकर,प्रेमचंद कामडे, विश्राम बनसोड ,सुरेश पोहनकर,आनंद गोहने आदी उपस्थित होते.



