ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात ‘ओरीएंन्टल इन्शुरस कंपनी लि., पुणे’  या विमा कंपनीची शासनातर्फे नियुक्ती

'प्रधानमंत्री पिक विमा योजनेत' शेतकरी सभासदांनी सहभागी व्हावे

चांदा ब्लास्ट

“प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३” करीता ही योजना राज्य शासनानी लागू केली असून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हयात  ‘ओरीएंन्टल इन्शुरस कंपनी लि., पुणे’  या विमा कंपनीची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शासनानी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरीता सदर योजना ऐच्छिक केले असुन सन २०२३ २४ पासुन सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ १ रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयामध्ये अधिसुचीत केलेले महसुल मंडळनिहाय धान, ज्वारी, सोयाबिन, तुर, कापूस, मुंग व उडीद या अधिसुचीत पिकासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरीता सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२३ आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फतीने आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये