संतोष आमने नगराध्यक्ष पदाचे दावेदार!
शहरात चर्चा : भद्रावती पालीका निवडणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
निवडणुकिची तारीख जशी जाहीर झाली तसे शहरातील राजकीय तापमान वाढले आहे.ओबीसी सर्वसाधारण साठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता चांगलीच रंगत भरली असुन अनेक इच्छुक ऊमेदवार प्रमुख पक्षांचे तिकीट आपल्याच पदरात पडावे यासाठी प्रयत्नात लागले आहे.
शिवसेनेतील फुट फुट ही भाजपच्या पत्त्यावर पडणार असल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असले तरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देतांना भाजप पक्षश्रेष्ठींची चागलीच दमछाक होणार आहे.भाजपमधे अनेक इच्छुक ऊमेदवार असले तरी भद्रावती पालीकेचे माजी उपाध्यक्ष संतोष आमचे यांच्या नावाची चर्चा नगराध्क्षपदाचे भाजपचे ऊमेदवार म्हणुन नागरीकांमधे होतांना दिसत आहे. संतोष आमने हे एक शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायीक असुन त्यांना नगरपालीका कारभाराचा पाच वर्षाचा अनुभव आहे.
या अनुभवाचा फायदा ते शहराच्या विकासासाठी करु शकतात. आपला नम्र स्वभाव व शहरभर असलेल्या संपर्कामुळे ते शहरात लोकप्रिय आहेत.त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यास ते हमखास निवडून येइल अशी शहरात चर्चा आहे.अनेक इच्छुक ऊमेदवारांनी भाजपकडे नगराध्यक्षपदाच्या ऊमेदवारीसाठी मागणी केली त्यात संतोष आमचे यांचाही समावेश आहे.या सर्वात फ्रेश व ऊमदे ऊमेदवार म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने ते ऊमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.आजपर्यंत भद्रावती पालीकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती.त्यांच्या दिर्घ काळाच्या राजवटीनंतरही शहरातील विवीध समस्या कायम आहेत.शहरात प्राथमीक सुविधांचा अद्यापही अभाव दिसुन येतो.
शहरातील रस्ते,भाजीमंडीची इमारत, झालेला करीत भ्रष्टाचार, भर बाजारातील दारु दुकान, प्राचीन वडाच्या झाडाची कत्तल, शहरातील अतीक्रमण,दिवाबत्तीतील अनियमीतता,पालीकेवर झालेली न्यायालयीन कारवाई झोपडपट्टी विकास,सांडपाण्याची व्यवस्था,कमीशनखोरीचा व्हिडिओ असे अनेक मुद्दे या निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शहराला आता नव्या दमाच्या चेहऱ्याची आवशकता असुन तो चेहरा संतोष आमनेच्या रुपाने जनतेसमोर आहे.संतोष आमने यांचे घराने भाजप निष्ठावंत असल्याचे मानल्या जाते.त्यामुळे भाजपची नगराध्यक्षपदाची उमेदवारी ही संतोष आमने यांना मिळावी असे बहुसंख्य नागरिकांना वाटते.भविष्यात संतोष आमने हे शहराचा विकास योग्य रीतीने करु शकेल असे अनेकांना वाटते.संतोष आमने यांना उमेदवारी मिळाल्यास ते हि जागा सहजतेने जिंकु शकतात असे अनेकांना वाटते.
मात्र सध्या ऊमेदवारीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे.वेळेवर कोणत्या इच्छुकाला उमेदवारी मिळेल हे येणारा काळच ठरवेल.मात्र संतोष आमने यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यात हमखास जिंकण्याची क्षमता असल्याचे बोलल्या जात आहे.



