माती उत्खनन कंपनीने स्थानिकाना रोजगार द्यावा
आर पी आय ची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
के व्ही आर कंपनीला माती उत्खलनाचे काम प्राप्त झाले आहे.ही खूप आनंदाची बाब आहे.कारण स्थानिकांना रोजगार मिळणार.आहे,परंतु कंपनीने काम चालू करून दोन महिन्यांहून अधिक कालावधी झालेला आहे.तरीपण कंपनीने स्थानिक कामगार घेण्यास टाळाटाळ करून,परप्रांतीय कामगारांना सामावुन घेतल्या जात आहे.ही स्थानिक कामगारांच्या रोजगाराची थट्टा आहे.
इथे प्रदूषण स्थानिक परिवार सहन करत आहे. जमीन जुमला, सोई सुविधा स्थानिक लोकांचा आणि रोजगारापासून स्थानिकांना जर डावलत असाल तर स्थानिकांनी जगावे तर जगावे कशाच्या आधारावर? स्थानिकांची उपासमार आणि रोजगार पूर्ण परप्रांतियांना हे कसे काय खपऊन घेतल्या जाणार?
करीता स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने केली आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले नाही तर जीवनमानाशी निगडित असलेल्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे चिटणीस अशोककुमार उमरे यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रति पालकमंत्री, खासदार,जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, क्षेत्रीय व्यवस्थापक, वेस्टर्न कोल फील्ड दुर्गापूर, आर पी आय चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, तथा जिल्हा अध्यक्ष यांना पाठविण्यात आल्या आहेत.



