ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“वंदे मातरम” गीताला १५० वर्षे पूर्ण : राज्यभर देशभक्तीचा उत्सव!

भद्रावती शहरात ७ नोव्हेंबरला वंदे मातरम गीतगायन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्रोत ठरलेले राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ या गीताला यंदा ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विद्यापीठे आणि कौशल्य विकास केंद्रांमध्ये देशभक्तीपर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सदर उपक्रम भद्रावती येथे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली असून, समितीची बैठक तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी ३ वाजता तहसिलदार भद्रावती यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचा शुभारंभ ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात होणार असून, त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताचे गायन होणार आहे. तसेच देशभक्तीपर भाषणे व ईतर उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

बैठकीला तहसिलदार बालाजी कदम, सहायक गटविकास अधिकारी बंडू आकनुरवार, आयटीआय भद्रावतीचे प्राचार्य राजु श्रीरामे, पोलिस उपनिरीक्षक विरेंद्र केदारे, प्रविण चिमुरकर, वतन लोणे, डॉ. सुधिर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार, पांडूरंग कांबळे, संदिप पोटे, नागसेन पाझारे, विकास दुर्योधन, प्रतिभा सोनटक्के, आर. सोनकांबळे, सोनल वावरे उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी शालेय विद्यार्थी, शिक्षक, नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये