ऑटो अपघातातील त्या जखमीं महिलेचा मृत्यू
ऑटो चालक विरोधात गुन्हा दाखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
उंबरखेड गावाजवळ भरधाव वेगाने जात असलेला ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातातील जखमीं महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतक महिलेचामुलगा रामेश्वर गाटोळ याने पोलीस ठाण्यात दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी फिर्याद दिली असून पोलिसांनी ऑटो चालक पुरुषोत्तम खांडेभराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. सविस्तर वृत्त असे की,
दिनांक 24.ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.30 वा. आटो चालक पुरुषोत्तम आनंदराव खांडेभराड रा. देऊळगांव राजा याने त्याचे ताब्यातील ऍटो रिक्षा क्रमांक MH-28-BA-1839 हि भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन उंबरखेड गावाचे समोर कचरा डेपको चे, पाठीमागे पुलाजवळ पलटी झाला. त्यामध्ये बसलेली फियार्दीची आई सत्यभामा आत्माराम गाटोळे वय 55 वर्षे हिचे डोक्याला, हाताला गंभीर मार लागला होता तसेच सुरेखा कैलास खरात यांना डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाल्या होत्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला तसेच बहीन कल्पना अनिल काळे किरकोळ जखमी झाली आहे, पोलिसांनी ऑटो चालक विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक कांचन जारवाल करीत आहे.



