‘स्वच्छता से स्वस्थता की ओर’ मॅरेथान स्पर्धा व स्वच्छता रॅली

चांदा ब्लास्ट
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व खेलो इंडीया अॅथलॅटीक्स केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचा संदेश देत ‘स्वच्छता से स्वस्थता की ओर’ मॅरेथान स्पर्धा व स्वच्छता रॅली नुकतीच पार पडली. यात खेलो इंडीयाचे खेळाडू व इतर खेळाडू, नागरीक व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी खेळाडूंना फिट इंडीया व खेलो इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने टी शर्ट वाटप करण्यात आले. आपले क्रीडांगण, आपले परिसर, आपले शहर, आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घोषणा देत ही स्वच्छता रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुल- वरोरा नाका-जटपूरा गेट व परत रामनगर-वरोरा नाका-जिल्हा क्रीडा संकूल येथे सदर रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी संदिप उईके, क्रीडा अधिकारी नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड, खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे व इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
					
					
					
					
					


