ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

3 घरफोडी व एक चोरीचा गुन्हा उघड करून 1 लाख 53 हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीताणा अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 25.10.2025 रोजी पो स्टे सावंगी मेघे फिर्यादी नामे सुरज प्रताप सिंग राठोड वय 32 वर्ष रा. गजानन नगरी पालोती रोड सावंगी मेघे वर्धा यांच्या घरी दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे मागच्या बाजूचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरातील मौल्यवान वस्तू व सोन्या- दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याचे सांगितले वरून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सावंगी मेघे अप क्रमांक 830/2025 कलम 305, 331 (2) बी एन एस प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

 नमूद गुन्ह्यात मा. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या मार्गदर्शनात सदर भागात चोरी घरफोडीचे गुन्ह्याची उकल करण्याकरता स्थानिक गुन्हे शाखा सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना, सदर आरोपी शोधकामी वरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपी निष्पन्न करून सदर आरोपींनी 4 महिन्याअगोदर सेवाग्राम, वर्धा, रामनगर. परिसरात घरपोडीचे गुन्हे केले असता त्यांना अटक करण्यात आले होते. दि. 4/11/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथकांना सदर गुन्ह्यात निष्पन्न आरोपी हे विक्रमशीला नगर परिसरात वावरत असल्याबाबतची विश्वसनीय माहिती मिळाल्यावरून पथके परिसरात रवाना होऊन सदर निष्पन्न आरोपींचा शोध घेतला असता, सदर आरोपी हे विक्रमशीला नगर येथे मित्रा कडे हजर मिळून आले.

सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव का विचारले असता त्याने त्याचे नाव. 1) सुदर्शन गंगाधर वाडेकर वय 23 वर्ष, रा. सर्कस ग्राउंड रामनगर. 2) ओम संजय नवले वय 19 वर्ष विक्रम शीला नगर वर्धा 3) एक विधी संघर्ष बालक चोरीच्या गुन्हा संबंधाने सखोल विचारपूस केली असता पोलीस स्टेशन सावंगी मेघे हद्दीतील गणेश नगरी व पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत जोशी लेआउट पोलीस स्टेशन देवळी हद्दीमध्ये महालक्ष्मी टाऊन येथे चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीचे ताब्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह असा एकूण जुमला किंमत 1,53,500/- रू चा जप्त करून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन, सावंगी मेघे करीत आहे.

       सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो उप नि प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, विकास मुंढे, सुगम चोधरी, शूभम राउत, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे, राहुल अथवाल, दिनेश बोरकर,अक्षय राऊत यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये